हॉटेल मधून अज्ञात चोरट्याने 27.60 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास

0

पिंपरी : म्हाळुंगे बालेवाडी येथील हॉटेल मधून अज्ञात चोरट्याने 27.60 लाख रुपये किंमतीचा माल असणारी बॅग पळवल्याची घटना 6 डिसेंबर रोजी घडली आहे.

याबाबत विक्रमकुमार भोजाणी (47, रा. बंगलूरू) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भा. द. वि कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 6 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 4.45 वा चे सुमारास ऑर्चीड हॉटेल सी. सी. लॉबी, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे घडली आहे.

फिर्यादी यांनी त्यांच्या भाच्याच्या लग्नासाठी आणलेले 17.50 लाख रुपये किंमतीचे 650 ग्राम सोन्याचे दागिने, एक 1 लाख रुपये किंमतीचे डायमंडचे हॆअरिंग, 9 लाख रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, 10,000 रुपये किंमतीचा मोबाईल फोन असलेली काळ्या रंगाची बॅग मधील एकूण 27.60 लाख रुपये किंमतीचा माल कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.