पोलीस चौकी बाहेरच दोन गट भिडले

0

पिंपरी : जमिनीच्या वादातून तक्रार कऱण्यासाठी आलेल्या दोन गटामध्ये पिंपरी पोलीस चौकी बाहेरच मारामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. हा प्रकार पिंपरी पोलीस चौकी बाहेर गुरुवारी (दि.15) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.

पहिल्या तक्रारीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पिंपरी पोलिसांनी सागर शंकर पारखे व प्रशांत प्रकाश पारखे (दोघे रा. रावेत) यांना अटक केले आहे तर स्वप्नील शंकर पारखे (रा. देहूरोड), अशरफ रज्जाक शेख (रा. विकासनगर, देहुरोड) व तीन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे नातेवाईक पिंपरी रेल्वे स्टेशन रोडवरून जात असताना पिंपरी पोलीस चौकीसमोर आरोपी आले व त्यांनी फिर्यादीला अडवून तुला हिस्सा पाहिजे, तुला पैसे पाहिजे आहेत? म्हणत हाताने मारहाण करत शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. त्यातील एका आरोपीने तर फिर्यादीच्या हाताचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. तर स्वप्नील याने फिर्य़ादी यांच्या नातीशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच अशरफ याने अश्लिल भाषेचा वापर करत धमकी दिली. यावरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

तर प्रशांत पारखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन पुरुष व चार महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी यांच्या आत्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावेळी चौकशीसाठी पोलिसांनी फिर्यादी यांना बोलावले होते. यावेळी चौकीत दोन्ही गटामध्या वाद सुरु झाला असता पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. चौकी समोर येताच आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण कऱण्यास सुरुवात केली. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हे दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.