पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक

0

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे.

बुधवारी हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.