यूपीमध्ये ‘इतक्या’ लाख कोटींची होणार गुंतवणूक

0

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दोन दिवसीय दौरा यशस्वीपणे पार पडला आहे. या दौ-यात योगी यांनी अनेक उद्योगपतींची भेट घेतली असून उत्तर प्रदेशात 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.

या दौऱ्यावेळी गुरुवारी त्यांनी मुंबईतील बॅंकर्स, आघाडीचे उद्योगपती, अभिनेते आणि निर्मात्यांसोबत चर्चा केली. उत्तर प्रदेशात होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेसाठी उद्योगपतींना निमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले होते. योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत मुकेश अंबानी यांच्यासह देशातील प्रमुख उद्योजकांची भेट घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून सांगण्यात आले की, रिलायन्स समूहाने राज्यभरात 5 तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचा आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

रिलायन्सप्रमाणेच अदानी समुहानेही उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. अदानी समूहाने एनसीआरमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालय आणि नोएडामध्ये 10,000 तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा, एसआयडीबीआयचे शिव सुब्रह्मण्यम रमण यांच्यासारख्या बॅंकर्सचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला, हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी, जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी आणि अध्यक्ष सज्जन जिंदाल, पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्याशी चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.