रिक्षावाले जिंकले; रॅपिडो बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

रस्त्यावरील लढाईबरोबर न्यायालयीन लढाई देखील जिंकलो : बाबा कांबळे

0

पिंपरी : रॅपिडो कंपनीची बेकायदेशीर दुचाकी टॅक्‍सी बंद होण्यासाठी वारंवार निवेदने, आंदोलने छेडत होतो. त्या विरोधात आम्ही रस्त्यावरची लढाई लढली आहे. पुण्यामध्ये रिक्षा बंद करण्याचे मोठे आंदोलन घेतले होते. रस्त्यावरची लढाई जिंकली होती. दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढा देखील सुरूच होता. कोट्यवधी रिक्षा चालक मालकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर रॅपिडो कंपनीच्या प्रवासी वाहतूकीला बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे न्यायालयीन लढाई देखील आम्ही जिंकलो असून रिक्षा चालक मालकांचा हा विजय असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रतिपादन केले. न्याय दिल्याबद्दल न्यायदेवतेचे आभार व्यक्त करतो, असेही बाबा कांबळे म्हणाले.

रॅपिडो कंपनीने दुचाकी प्रवासी वाहतूकीबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होती. त्या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे आनंद तांबे यांनी न्यायालयामध्ये आमचे म्हणणे ऐकूण घ्यावे, यासाठी पुर्नयाचिका दाखल केली होती. त्याची आज शुक्रवारी (दि. 13) सुनावणी झाली. या वेळी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

या सूनावणीवेळी महराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे विजय ढवळे, सर्वसामान्य रिक्षा चालक आप्पा हिरेमठ, संतोष नेवासकर, सचिन रसाळ आदीसह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालकांचे हातावरचे पोट आहे. दिवसभर राबल्यानंतर आपले घर कसेबसे चालवले जाते. मात्र ओला-उबेर, रॅपिडो या मोठ्या खासगी कंपन्या प्रवासी वाहतूक करायला लागल्यापासून रिक्षा चालकांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. प्रवाशी मिळत नव्हते. संबंधीत खासगी कंपन्यांनी कायदेशीर प्रक्रिया देखील पुर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची प्रवासी वाहतूक बेकायदेशीर असल्याचे आम्ही सांगत होतो. त्या विरोधात सातत्याने आंदोलने छेडत होतो. नुकतीच न्यायालयात ही आरपारची लढाई पोचली. त्यामध्ये न्यायदेवतेने रिक्षा चालकांचे म्हणणे ऐकून घेऊन रिक्षा चालकांना न्याय दिला असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.