पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी

0

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत.

रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.