पैलवान खाशाबा जाधव यांची गुगलने खास दखल घेतली मात्र सरकारला अद्याप जाग नाही : संभाजीराजे

0

मुंबई : 1952 मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून खाशाबा जाधव यांना अभिवादन केले आहे.

यानिमित्त माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती संभाजीराजे यांनी सरकार केव्हा जागे होणार व खाशाबा जाधव यांचा उचित सन्मान करणार, असा सवाल केला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, खाशाबा जाधव यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून “पद्म” पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मी राज्यसभा खासदार असताना 2017 ते 2022 अशी सहा वर्षे सलग खाशाबा जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ मिळावा यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र शेवटी खाशाबा जाधव यांची उपेक्षाच झाली. आता तरी सरकारने जागे व्हावे.

Leave A Reply

Your email address will not be published.