आठ हजार पदाची मेगाभरती : राज्य लोकसेवा आयोगाची जहिरात

0

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांत ८,१६९ पदभरतीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध केली. आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. एका अर्जाद्वारे विविध संवर्गातील उमेदवारांना सहभागी होता येणार असल्याची माहिती आयोग अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.

इच्छुक उमेदवारांनी २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहनही अध्यक्ष निंबाळकर यांनी केले. या पदभरतीसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीचा तपशील, अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अशा आहेत जागा: सर्वाधिक ७ हजार पदे लिपिक पदाची
{सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
{महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे
{वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
{गृह विभाग- पोलिस उपनिरीक्षक – ३७४ पदे
{महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे
{गृह विभाग- दुय्यम निरीक्षक
{राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
{वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद
{वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदांची ही जािहरात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.