नकली हॉलमार्कचे 1 कोटीचे दागिने जप्त

0

मुंबई : भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हाॅलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे 1 कोटी 5 लाखांचे दागिने जप्त केले. राज्यात हाॅलमार्कचा नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती बीआयएसला मिळाली होती. त्यावरून नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हाॅलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे 2.75 किलोग्रॅम दागिने जप्त करण्यात आले.

बीआयएसने ठरवून दिलेली गुणवत्ता आणि निकषांची पूर्तता न करताच राज्यात हाॅलमार्कचा नकली होलोग्राम लावून सोन्याची दागिने विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. बीआयएस ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. राष्ट्रीय मानके तयार करून त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

या अंतर्गत सोन्या/चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धता प्रमाणपत्रासाठी हॉलमार्क आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर राज्यात कारवाई केली जात आहे. नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी बीआयएसच्या केंद्रांवर याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. बीआयएसची गुणवत्ता तपासणी केंद्रे असताना नकली हाेलोमार्क लागतोच कसा, मग ही केंद्रे काय कामाची असा सवाल रोकडे यांनी केला आहे.

6 अंकी अल्फान्यूमेरिक कोडला एचयूआयडी म्हणतात. यामध्ये अक्षरे तसेच अंकांचा समावेश होतो. नवीन नियमांनुसार, देशात निर्मित प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांना एक युनीक एचयूआयडी कोड दिलेला आहे. यामुळे दागिन्यांची शुद्धता तपासण्यात मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.