बाराव्या मजल्यावरून उडी मारुन ‘बाप-लेकाची’ आत्महत्या

0

पिंपरी : मुलाने बाराव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटानंतर वडिलांनीही उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना वाकड परिसरातील मालपाणी सोसायटी मध्ये गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

क्रांती भीमराव तायडे (44) आणि त्यांचा मुलगा आदेश क्रांती तायडे (16, रा. ठि मालपाणी ग्रीन सोसायटी, पिंक सिटी रोड, वाकड) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; वडील क्रांती आणि मुलगा आदेश हे दोघे मालपाणी सोसायटी मध्ये राहत होते. गुरुवारी रात्री पहिले मुलाने आणि नंतर वडिलांनी बाराव्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केली. सोसायटीमधील नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले.

सोसायटीमधील प्राथमिक माहितीनुसार दोघे ही मनोरुग्ण होते. वडीलांची नोकरी गेली होती. त्यामुळे कुटुंबावर कर्ज झाले होते. मात्र आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मागे  पत्नी आरती तायडे, आई उषा भीमराव तायडे तसेच मुलगी 15 वर्षे असा परिवार आहे. तपास पोलीस करत आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.