‘ईडी’ची कारवाई; तपासात सहकार्य न करता पुरावे नष्ट केल्याप्रकरणी मूलचंदानींच्या भावांना व पुतण्याला अटक

0

पिंपरी : सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले, तेव्हा त्यांच्या तपासात अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही, उलट पुरावा नष्ट केला. तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत ,रात्री पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावांना व पुतण्याला अटक केली आहे.

अशोक साधुराम मूलचंदानी (57), मनोहर साधुराम मूलचंदानी (61) सागर मनोहर मूलचंदानी (26, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच आणखी दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले. तर अमर मूलचंदानी हे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. रात्री उशीरा ईडीने चौकशी पूर्ण केल्यावर ही तक्रार दिली होती.

अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. पिंपरी मधील  मिस्ट्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचे वाटप केल्याचेआणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि आज ईडीने छापा टाकला होता. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यावधीचा पैसा अडकून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.