पिंपरी : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत सध्या उमेदवारी कोणाला मिळणार? यावरून सध्या चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शंकर जगताप यांना दिलेली भेट ही नव्या चर्चेचे कारण बनले आहे. यावर आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण शंकर जगताप यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीवरुन थेट दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी गेले. यावर शंकर जगताप यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले, की फडणवीस यांना शोक सभेनंतर आमच्या घरी येयचेच होते. पण, वेळेअभावी त्यांना शक्य झाले नाही. आज त्यांना वेळ मिळाल्याने केवळ सांत्वन म्हणून ते घरी आले. आमच्यात बंद दाराआड कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
शंकर जगताप यांनी असे कारण दिले असले, तरी सध्या भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी तर बंधु शंकर जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाणार आहे. जर या निवडणुकीत अश्विनी जगताप उभ्या राहिल्या तर ही निवडणूक बिनविरोध होईल असे इतर पक्षांची भूमिका आहे; त्यामुळे शंकर जगताप यांची मनधरणी करायला देवेंद्र फडणवीस गेले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.