विधान परिषदेच्या 5 जागा अन् 83 उमेदवार; आज सुरु आहे मतदान

0

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार काल संपला. या निवडणुकीबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर नागपूर शिक्षक जागेवर भाजपचे नागो गाणार यांच्या विरोधात आघाडीचे सुधाकर अडागळे, अमरावती पदवीधर जागेवर भाजपचे रणजित पाटील विरूद्ध धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्याशी किरण पाटील यांच्यात लढत आहे. कोकणात आघाडीचे बाळाराम पाटील हे भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत आहेत. या निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत.

सत्यजित हे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आहेत. अशा स्थितीत तांबे यांच्या बंडखोरीमुळे थोरात यांच्या प्रतिमेला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी यांना पराभूत करण्यात यश येते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर शुभांगी पाटील यांना या जागेवरून विजयी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे सोमवारी निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ. विक्रम काळे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माघार घेत ही जागा काँग्रेसला सोडण्यास संमती दिली. शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. आता अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढतील. अपक्ष उमेदवारी दाखल करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनी माघार न घेतल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

असा रंगणार रणसंग्राम

अमरावती पदवीधर मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – १०
रिंगणातील उमेदवार – २३

प्रमुख लढत – १. डॉ. रणजित पाटील (भाजप), २. धीरज लिंगाडे (काँग्रेस), ३. अनिल अमलकार (वंचित बहुजन आघाडी),
४. डॉ. गौरव गवई (बहुजन भारत पार्टी)

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – ६
रिंगणातील उमेदवार – १६

प्रमुख लढत –
१. सत्यजित तांबे (अपक्ष) भाजपचा पाठिंबा
२. शुभांगी पाटील (अपक्ष) mva चा पाठिंबा

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – १
रिंगणातील उमेदवार – १४

प्रमुख लढत –
१. विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), २. प्रदीप सोळुंके (राष्ट्रवादी बंडखोर), ३. प्रा. किरण पाटील (भाजप), ४. कालिदास माने (वंचित बहुजन आघाडी), ५. सूर्यकांत विश्वासराव (मराठवाडा शिक्षक संघ)

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – ५
रिंगणातील उमेदवार – २२

प्रमुख लढत – १. नागो गाणार (शिक्षक परिषद, भाजप समर्थित), २. राजेंद्र झाडे (शिक्षक भारती), ३. सुधाकर अडबाले (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मविआ समर्थित)

कोकण शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले – ५
रिंगणातील उमेदवार – ८

प्रमुख लढत – १. ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), २. बाळाराम पाटील (अपक्ष)

Leave A Reply

Your email address will not be published.