गुन्हे शाखा युनिट चारने तीन तर दरोडा विरोधी पथकाने चार पिस्टल पकडले

0

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने तीन कारवाया करत सात पिस्टल आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 29) सहा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. यामध्ये युनिट चारच्या पथकाने तीन पिस्तुल आणि दरोडा विरोधी पथकाने चार पिस्तुल जप्त केले आहेत.

गुन्हे शाखा युनिट चारने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली फाट्याजवळ शनिवारी (दि. 28) रात्री अकरा वाजता कारवाई केली. त्यात अक्षय रवी पाखरे (22, रा. म्हाळुंगे इंगळे), प्रवीण भारत म्हस्के (20, रा. पिंपळे सौदागर) यांना अटक करत त्यांच्याकडून एक लाख चार हजारांच्या दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

गुन्हे शाखा युनिट चारने दुसरी कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख वस्ती येथे रविवारी (दि. 29) पहाटे सव्वाचार वाजता केली. तुषार महिपती मगर (24, रा. शेडगेवस्ती, वाकड) याला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी 50 हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सहाय्यक निरीक्षक सिध्दनाथ बाबर, जाधव, नदाफ, चव्हाण, शिंदे, काळे, गावंडे, शेटे, दळे, मुंडे, जयभाये यांच्या पथकाने कामगिरी केली.

दरोडा विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. 28) रात्री अकरा वाजता कारवाई करून तिघांना अटक केली. रामदास सुरेश सुकळे (39, रा. सरदार चौक, खेड), रियाज हुसेन शेख (22, रा. पडाळी, ता. खेड), तुषार उर्फ डेल्या शांताराम टेके (24, रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 77 हजार 510 रुपये किमतीच्या चार पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, उपनिरीक्षक मंगेश भांगे, सहाय्यक पोलीस फौजदार महेश खांडे, पोलीस हवालदार नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, प्रशांत सैद, गणेश कोकणे, अमर कदम यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.