पिंपरी : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून पक्षापासून अंतर ठेवून राहणारे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मार्गावर आहेत का अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आमदार बनसोडे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.
2014 ला झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत अजित पवार यांनी नगरसेविकेला जाहीर झालेली उमेदवारी रद्द करुन बनसोडे यांना उमेदवारी दिली. दादांच्या पाठिंब्यामुळे ते पुन्हा पिंपरी मतदार संघाचे आमदार झाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. 2019 मध्ये जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा एकमेवर बनसोडे हे शेवटपर्यंत अजित पवार यांच्यासोबत राहिले होते.
पानटपरी चालविणाऱ्या बनसोडे यांना अजित पवार यांनी राजकीय ताकद दिली. त्यामुळे पानटपरी चालविणारे बनसोडे हे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि दोनदा आमदार झाले. बनसोडे यांच्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने ते शिंदे गटात प्रवेश करतात की काय अशी शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर अंतिम दर्शनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बनसोडे यांना बोलावून समोर स्थान देण्यात आले होते.
अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. बनसोडे यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे आमदार आण्णा बनसोडे यांचे नक्की काय चालू आहे ? हे समजण्यास मार्ग नाही.