चिंचवड पोटनिवडणूक : राष्ट्रवादीने ‘या’ इच्छुकांची नावे पाठवली प्रदेशाध्यक्षांना

0

पिंपरी : पुण्यातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या मासिक बैठकीनंतर इच्छूक उमेदवारांची नावं पक्षाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यातआला आहे. विशेष म्हणजे आम्ही पाठविलेल्या नावांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, त्या उमेदवारास आम्ही निवडून आणू असं पत्रप्रदेश पातळीवरील नेत्यांना पाठविण्यात आले आहे, अशी खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली.

चिंचवड विधानसभेचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पोटनिवडणूकजाहीर झाली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लढविण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादी, काॅंग्रेस, आणि शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीत अद्याप उमेदवारीवरुन एकमत होतनसल्याने इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निरीक्षक आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पारपडली. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील इतर पक्षामध्ये निवडणूकलढवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित हालचाल दिसत नाही, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे असाआग्रह यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जोर धरला आहे. या बैठकीत एकूण सहा इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्याचानिर्णय घेण्यात आला आहे.

इच्छूकांमध्ये कोण कोण?
शहरातील राष्ट्रवादीचे 06 नेते आणि पदाधिकारी या जागांवरुन पोटनिवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यांची यादी प्रदेशाध्यक्षांकडेपाठवण्यात आली असून यामध्ये ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूरकलाटे, राजेंद्र जगताप यांचा समावेश आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छूक असल्याचं दर्शवत आहेत. त्यात काँग्रेस आणि शिवसेनेनंहीयापूर्वीच चिंचवडच्या जागांवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या जागांवरुन आघाडीत बिघाडी होणार कीनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार हे येणाया काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.