अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नव्हता. अवैध मतांच्या फेर मोजणीची मागणी भाजप उमेदवार डॉ.रणजित पाटील यांनी केली. यानंतरही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना मताधिक्य कायम राहिले. धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार पाटील यांचा 3368 मतांनी पराभव केला. मतमोजणी तब्बल 30 तास चालू होती.
अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत आहे. काल दुपारी धीरज लिंगाडे हे 2 हजार मतांनी आघाडीवर होते. पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी केल्याने कुणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अमरावतीमध्ये एकूण मतमोजणीमध्ये 8 हजार 735 मते अवैध ठरली असून, महत्वाची बाब म्हणजे जवळपास 4 हजारांच्यावर मतदारांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या नावापुढे केवळ 2 हा क्रमांक लिहून मतदान केले. या चार हजार अवैध मतांचा फटका मात्र भाजप उमेदवार रणजित पाटील यांना बसला आहे. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती.