शहरात 15 दिवसात 48 पिस्तुल, 205 हत्यारे सापडली

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची मोहीम; गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस 'रिचार्ज

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 19 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या 15 दिवसांच्या कालावधीत 211 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 253 घातक शस्त्रे जप्त केली आहेत. पोलिसांनी राबवलेल्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शक्कल लढवत विशेष मोहीम राबवली. यामध्ये गुन्हे शाखेत कामाची स्पर्धा लागली चांगली कामगिरी घडली. स्थानिक पोलिसांनीही यामध्ये सहभाग नोंदवला.

या मोहितेम पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेले सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 36 गुन्हे हे केवळ बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या विरोधात दाखल केले असून इतर घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी 150 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत पोलिसांनी 211 आरोपींना अटक केले आहे. त्यांच्याकडून 48 पिस्टल, 205 घात शस्त्रे असे एकूण 253 शस्त्रे जप्त केली आहेत.

हि कारवाई करत असताना तपासी पथकांनाही प्रोत्साहन मिळावे म्हणून कामगिरीनुसार त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. यात प्रथम क्रमांक दरोडा विरोधी पथक, द्वितीय क्रमांक गुंडा विरोधी पथक, तृतीय क्रमांक युनीट-4 यांनी मिळवला आहे. तसेच, पोलीस ठाणे स्तरावर महाळुंगे, शिरगाव, पिंपरी या पोलीस ठाणे यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या घटक प्रमुखांना व अंमलदारांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करणार आहेत. तसेच यापुढेही ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे, असेही पोलीस आयुक्त चौबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.