चिंचवड पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना शिट्टी चिन्ह

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अपक्ष लढत असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे. त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले आहे. दरम्यान, 2019 मध्ये कलाटे यांना बॅट मिळाली होती. यंदा शिट्टी मिळाली आहे.

पोनिवडणुकीमध्ये 28 उमेदवार असणार आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज पार पडली. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना  त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या 197 मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन  तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. निवडणूक  निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या थेरगांव येथील कार्यालयामधील   कक्षामध्ये  चिन्ह वाटप प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

हे आहेत निवडणूक चिन्ह

भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप – कमळ, राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे – घड्याळ, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे प्रफुल्ला मोतलिंग – कप आणि बशी, आजाद समाज पार्टी(कांशीराम)चे मनोज मधुकर खंडागळे – किटली, बहुजन भारत पार्टीचे लोंढे तुषार दिगंबर – बॅटरी टॉर्च, बहुजन मुक्ती पार्टीचे अॅड.सतिश श्रावण कांबिये – खाट, अपक्ष अजय हनुमंत लोंढे – ऑटो रिक्षा, अनिल बाबू सोनवणे – पाटी, अमोल ( देविका) अशोक सूर्यवंशी – ऊस शेतकरी, कलाटे राहुल तानाजी – शिट्टी, किशोर आत्माराम काशीकर – बॅट, गोपाळ यशवंतराव तंतरपाळे – कपाट, चंद्रकांत रंभाजी मोटे – टेबल, जावेद रशिद शेख – नारळाची बाग, दादाराव किसन कांबळे – प्रेशर कुकर, बालाजी लक्ष्मण जगताप – बुद्धीबळ पट, बोधे सुभाष गोपाळराव – हिरा, डॉ.भोसले मिलिंदराजे – फलंदाज, मिलिंद कांबळे – गॅस सिलेंडर, मोहन भागवत म्हस्के – फुटबॉल, रफिक रशिद कुरेशी – अंगठी, राजू उर्फ रविराज बबन काळे – कॅमेरा, शेख सोयलशहा युन्नुसशहा – हेलीकॉप्टर, श्रीधर साळवे – कॅरम बोर्ड, सतिश नाना सोनावणे – चालण्याची काठी, सिद्धिक ईस्माइल शेख – सफरचंद, सुधीर लक्ष्मण जगताप – जहाज आणि हरीष भिकोबा मोरे यांना शिवण यंत्र हे चिन्ह मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.