पिंपरी : जगताप डेअरी येथील अन्या बॉडी मसाज व स्पा सेंटरवर छापा मारत पोलिसांनी स्पा मॅनेजरसह चार जणांना अटक केली असून एका महिलेचे सुटका केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.9) रात्री घडली.
प्रतिक कोलम (48, रा. कोरेगाव पार्क), प्रियो सोयम मिताई (30, रा. वाकड), राज टंकाबहादूर (22) आणि महिला आरोपी यांना अटक केली आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार बंडू मारणे यांनी फिर्याद दिली आहे. पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते.
यावरून छापा टाकत पोलिसांनी पीडितेची सुटका करत मॅनेजरसह चौघांना अटक केली आहे. तपास पोलीस करत आहेत.