100 कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकतील : उद्धव ठाकरे

धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही

0

मुंबई : धनुष्यबाण आमच्या पुजेमधील असून तो पुजेतच राहील. त्यावेळी जी लढाई झाली तेव्हा रावणाकडे धनुष्यबाण असेल पण शेवटी श्रारीमाकडेच धनुष्यबाण जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. असा धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही. लोकशाहीवरील अत्याचार अनेकांना मान्य नाही. चोरांना राजमान्यता देणे भूषणावह नाही, चोर तो चोरच असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असून त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आज रात्री पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज जो निवडणूक आयोगाने दिलेला नि्काल हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरूवात करीत आहोत हे बोलण्याचे धाडस लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी करायला हरकत नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, जिथे तिथे सरकारची दादागिरी सुरू आहे. अगदी न्याययंत्रणाही दबावात कशी येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे त्यांना अधिकार हवे आहेत. चोराला राज्यमान्यता देणे हे काहीजणांना भूषणावह वाटत असेल पण चोर तो चोर, आज जी दयनिय अवस्था जगातील सर्वात मोठ्या पक्षाची आणि बंडखोरांची झाली आहे. माझे त्यांना आव्हान होते की, निवडणुका घ्या मैदानात या. पण त्यांची हिंमत झाली नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण आणि शिवसेना हे मिंधे गटाला दिले आहे. म्हणजे कदाचित आता मनपा इलेक्शन पुढच्या महिन्यात जाहीर होतील कारण त्यांना आता मुुंबई जिंकायची आहे. मुंबईच्या हाती भीकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची आहे. त्यासाठी धनुष्यबाण चिन्हाचा ते वापर करतील. ते मशालही घेवू शकतात पण आता ती पेटली.

उद्धव ठाकरे म्हणाले, आजच्या पुरते त्यांनी धनुष्यबाण चोरले ते कागदावरचे आहे. पण खरे धनुष्यबाण माझ्याकडे आहे. ते आमच्या देव्हाऱ्यात आहे. शिवसेना लेचीपेची नाही. आमच्या देव्हाऱ्यात शिवसेनाप्रमुखांनी धनुष्यबाणाची पुजा केलेली होती. तो धनुष्यबाण आमच्या पुजेतच राहणार. रावणाकडे धनुष्यबाण जरी असला तरी शेवटी रामाकडेच धनुष्यबाण राहील. शेवटी सत्याचाच विजय होईल.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपली चोरी पचली म्हणून चोराला आनंद झाला असेल. नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. आम्ही लवकरच या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. शेवटीच चोरबाजारालाच मान्यता मिळत असेल तर बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाही. शेवटी बाजारबुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणारे नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे तो अंध धृतराष्ट्र नाही,आम्हाला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालयात याचा निकाल लागेल. दुसरी बाब म्हणजे अपात्रतेची केस सुरू आहे जर घटना मानून निर्णय लागला तर तो काय लागेल सोळा जण अपात्र होणार हे घटनातज्ज्ञांचे मत आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय लघू सुक्ष्म मंत्र्यांनी ब्रेकींग न्यूज द्या धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार हे सांगितले होते. हा ठरवलेला कट आहे का, कटकारस्थान होतेच आहे पण कटात केवढ्या पातळीवरचे लोक सामील झाले हे महाराष्ट्रातील लोकांना समजले. उपमुख्यमंत्रीही म्हणाले होते की, धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार पुन्हा सांगतो धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, चोर कधीही मर्दानगी गाजू शकत नाही. हे नामर्दानो तुम्हाला जरी चोरी पचली असे वाटत असेल तरीही जनता तुमचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काही तरी गडबड करणार हे आधीच वाटले होते. शेवटी न्यायदेवता स्वतंत्र आहे. सुनावणी 21 तारखेपासून सर्वोच्च न्यायालयात केस चालणार आहे. प्रत्येक कंगोरा तपासून घेत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या केसवर जगाचे लक्ष आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांनो, शिवसेनाप्रमींनो कुठेही खचू नका. मैदानात उतरलो तर आता माघारी परतायचे नाही. त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो, पक्षाचे नाव, चिन्ह चोरले. त्यांना ही चोरी पचणार नाही. निवडणूक आयोगाचे वकील कोर्टात फड पडतो कधी आणि आम्ही झेलतोय कधी असे त्यांना वाटत होते. शेवटी गडबड केलीच.

 

Leave A Reply

Your email address will not be published.