शिवनेरी सोहळा : शिवभक्तांना किल्ल्यावर जाण्यास अडवले; संभाजीराचे आक्रमक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुरू आहे सोहळा

0

शिवनेरी : शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यास उपस्थित आहेत. राज्य सरकारच्या वतीने या शासकीय सोहळ्याचे आयोजन केले जाते.

राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळ डोळ्याचे पारणे फेडणारा ठरतो. लाखो शिवप्रेमी या निमित्त शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित आहे. मात्र, माझ्यासोबत आलेल्या सर्व तरुणांना जो पर्यंत किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून काढण्याचा प्रयत्न देखील केला. शिवसेनी किल्ल्यावर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोपही संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक खासदार अमोल कोल्हेंनी या शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप खासदार कोल्हे यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडावरून निघून गेल्यानंतर आम्ही गडावर जाऊन दर्शन घेणार असल्याचे देखील खासदार अमोल कोल्हेंनी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.