मुंबई : देशात भाजपचा गड ढासळत असून त्यांची संख्या कमी होत असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्रात 48 जागा मिळवण्यासाठी ते आता प्रयत्न करू लागले आहे. मविआ तीन पक्ष एकत्रित आल्यास भाजपला केवळ 13 ते 14 जागा मिळतील असे मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
जयंत भाजपच्या हातून कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणूक गेली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री रोज पुण्यात आहेत. तर भाजपला कसब्यातील जनता चांगला धडा शिकवेल. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 48 जागा जिंकण्याची गरज भाजपला का निर्माण झाली आहे? असा सवाल करीत त्याचे उत्तरही त्यांनी दिले.
जयंत पाटील म्हणाले, शिवसेना हे नाव आणि चिन्ह जरी काढले गेले असेल तरी उद्धव ठाकरे जिकडे आहे तिकडे जनता जाईल.कोणते पक्ष नाव ,चिन्ह यापेक्षा त्यांचे काम मोठे आहे. अद्याप सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगा बाबात अंतिम निर्णय होणे बाकी आहे.ठाकरे सेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून सोपवला होता. त्यामुळे तो तिसऱ्याने चोरून नेला आहे अशी परिस्थिती आहे. जे पक्ष चोरून घेऊन गेले आहेत त्यांना निवडणुकीत जनता धडा शिकवेल. चिंचवड मध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पाठिबा न देता शिवसेना अपक्षाला पाठींबा दिला हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्याने स्वतंत्र निर्णय आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेना बाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे तो जनतेला पसंत पडणार नाही. त्यांना आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जनतेमध्ये प्रचंड सहानुभूती आहे. महाविकास आघाडी मधील पक्ष त्यांना एकटे पडू देणार नाही आम्ही त्यांच्यासोबत आहे.
थोरात म्हणाले, कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिले असल्याने भाजपला भीती वाटू लागली आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे तांत्रिकृष्ट वेगळे केले असले तरी ते कदापी वेगळे नाही.