मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘रोड शो’ला प्रचंड गर्दी

0

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २२) वाकडमध्येरोड शोकेला. निमित्त होते चिंचवड मतदारसंघाच्यापोटनिवडणुकीतील भाजपशिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा प्रचार. या रोड शो ला युवा वर्गानेप्रचंड गर्दी केली होती. यामध्येकमळ फुलू देच्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांसोबत रोड शोमध्ये भाजपशिवसेना आणि मित्रपक्षाचे अनेक नेते सामील झाले होते.

भाजप मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदारभरत गोगावले, आमदार उमा खापरे, भाजप प्रवक्ते एकनाथ पवार, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगतापरेणुसे यांच्यासह भाजप, शिवसेना मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  

मुख्यमंत्री वाकड येथील दत्त मंदिराजवळील उत्कर्ष चौकात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची बरसात करत त्यांचे भव्य स्वागतकेले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शोला सुरूवात केली. दत्त मंदिर रोडने थेरगावमधील डांगे चौक, दत्तनगर जुना जकात नाका, चिंचवडमधील चापेकर चौक, गांधीपेठ पॉवर हाउस चौक, केशवनगर, काळेवाडीतील एम. एम. हायस्कूल, कुणाल हॉटेल पासून पुढेविमल गार्डन समोरून शिवेंद्र लॉन्सपर्यंत त्यांनी भव्य रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्याअनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले. त्यांची छबी मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना लोक दिसत होते.

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोनिमित्त महायुतीच्या वतीने संपूर्ण मार्ग भगवेमय करण्यात आले होते. त्यांच्या रोड शोला तुफान गर्दी उसळलीहोती. त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. रोड शोच्या मार्गावर नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे ठिकठिकाणीजल्लोषात स्वागत केले. रस्त्याने ठिकठिकाणी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत होता. रोड शोमध्ये कमळ फुलू देआणि भाजपच्या विजयाच्या, महायुतीच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सगळीकडे माणसेच माणसे दिसत होती. नजर हटत नाही एवढी गर्दी झाली होती. रस्त्यांवर माणसांचा जत्थाच जत्था दिसत होता. रोड शोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणीमुख्यमंत्र्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. मुख्यमंत्रीही कधी हात उंचावून, तर कधी हात जोडून मतदारांना अभिवादन करतानादिसत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.