चिंचवड, कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात

0

 

पुणे : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल. तर सकाळी अकरा वाजेपर्यंत कल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या दोन्ही मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला असून त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आजचा निकाल महत्त्वाचा मानला जातोय.

दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणुक आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लगले आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीची मतमोजणी भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे होत आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल, प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.