पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतमोजणी होणार असून त्यानंतरप्रत्यक्ष झालेल्या मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी सुरू होईल संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ मतदारसंघात पहिल्याफेरी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर राहण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या फेरी भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे त्यांचीआघाडी तोडून पुढे जातात की काय हे पहावे लागेल मतमोजणी पहिली फेरी ही 14 केंद्राची असून त्यामध्ये मुख्यत्वे कागदी पुराकसबा पेठ येथील मतांची मोजणी होणार आहे त्यानंतर शनिवार पेठ तसेच रमण बाग नूमवी शाळा येथील मतांची मोजणी होणारआहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
कसबा पेठ मतदार संघाची पहिली फेरी; रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर
रविंद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर
कसबा पेठ मतदार संघाची पहिली फेरी; रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर
रवींद्र धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर
पोस्टल मतमोजणीत रवींद्र धंगेकर आघाडीवर
कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज पोटनिवडणुकीचानिकाल जाहीर होणार असून, पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीत रवींद्रधंगेकरांनी आघाडी घेतली आहे.