धक्कादायक…’गर्लफ्रेंड’साठी मुलाने केला वडिलांचा खून

मुलाच्या क्रुत्यात आईचाही सहभाग

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक धक्क्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या गर्लफ्रेंडला अपशब्दवापरला म्हणून पोटच्या मुलाने पत्नीने गळा आवळून वडिलांचा चक्क खून केला आहे. हि घटना दिघी येथे रविवारी (दि.5) रात्रीउशीरा घडली आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी राहूल अशोक जाधव (वय 25), अनिल अशोक जाधव (वय 23) यांना दिघी पोलिसांनी अटक केली असूनपत्नीवर ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अशोक रामदास जाधव (वय 45) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीबद्दल मयत अशोक यांनी अपशब्द वापरलेहोते. याचाच राग येवून दोन मुलांनी घरातील दोरीने गळा आवळून अशोक यांचा खून केला. यावेळी फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसतआईने पुरावा नष्ट कऱण्याचा प्रयत्न केला.तर राहूल याने मृतदेह घरातील फॅनला अडकवून आत्महत्या केल्याचा दिखावा केला. यावरूनपोलिसांनी तिघांविरोधातही गुन्हा दाखल केला असून दिघी पोलीस याचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.