प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

0

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहताना अनुपम खेर यांनी लिहिले की, सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सतीश कौशिक हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते.

7 मार्च रोजी जानकी कुटीर जुहू येथे जावेद अख्तर यांनी आयोजित केलेल्या होळी पार्टीत कौशिक यांनी होळी खेळली होती. त्यांनी या आनंदोत्सवाचे फोटो देखील ट्विट केले होते. त्यात लिहले होते की, जावेद अख्तर, शबाना आझमी, बाबा आझमी, तन्वी आझमी यांनी आयोजित केलेल्या होळी पार्टीत रंगीबेरंगी होळीचा आनंद घेतला. अली फलाज आणि ऋचा चढ्ढा हे नवविवाहित जोडपे भेटले. सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1965 रोजी हरियाणामध्ये झाला. शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोडी माल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा(NSD) मध्ये प्रवेश घेतला. 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिकसोबत लग्न केले. दोन वर्षांचा असतानाच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.