शिवज्योत घेऊन जाताना मोठा अपघात; 35 जण जखमी

0

पिंपरी: शिवजयंती ज्योत घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात
35 जण जखमी झाले आहेत. यातील 7 जणांची प्रकृती गंभीर आहे.

शुक्रवारी पहाटे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वाकड जवळ हा अपघात झाला आहे. टेम्पो आणि ट्रकचा अपघात होऊन हे जखमी झाले आहेत. जखमी पवना हॅास्पिटल मधे १७ जण, पायोनियर मधे ७-८ जण व रावेतला ३-४ जण एडमीट केलेले आहेत.

सर्व जखमी शिलाटणे गावचे आहेत. अपघातानंतर हायवेला वाहतुक कोंडी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.