पिंपरी :पतीने दारूच्या नशेत पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून भर रस्त्यात फुटपाथवर तिचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे उघडकीस आली.
सविता नामदेव राठोड (30) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती नामदेव राठोड (35, मूळ रा. सांगली, सध्या रा. हिंजवडी) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव याला दारूचे व्यसन आहे. दरम्यान, शनिवारी रात्री त्याने दारूच्या नशेत पत्नी सविताहिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सविता यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.राठोड दाम्पत्य मूळचेसांगली येथील आहेत. सध्या ते हिंजवडी येथे वास्तव्यास आहेत.हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.