दोन स्पा सेंटरवर छापे, नऊ पीडितांची सुटका

0

पिंपरी : पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि गुन्हे शाखा युनिट दोनने वाकडआणि हिंजवडी परिसरातील दोन स्पा सेंटरवर  छापेमारी केली आहे. हि कारवाई रविवारी (दि. 12) करण्यात आली.

वाकड परिसरातील कस्पटे वस्ती, मानकर चौकात असलेल्या एज लाईन वेलनेस स्पा यावर छापा मारून पोलिसांनी चार महाराष्ट्रीयनमहिलांची सुटका केली. स्पा मॅनेजर महिलेला अटक करून तिच्यासह किरण मंगेश जाधव (रा. हिंजवडी), मंगेश भगवान जाधव (35, रा. हिंजवडी), रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, स्वाईप मशीनआणि इतर साहित्य असा एकूण 16 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दुसरी कारवाई कस्तुरी चौक हिंजवडी येथील जलसा आयुर्वेदा या स्पा सेंटरमध्ये करण्यात आली. स्पा मॅनेजर सोमनाथ बाबुरावइरबतनवार (31, रा. कस्तुरी चौक, हिंजवडी. मूळ रा. लातूर), स्पा चालक मालक सचिन रतन केदारी (29, रा. वाकड) यांना अटककेली असून त्यांचा साथीदार रोहित मारुती दांडगडे (42, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 13 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पिंपरीचिंचवड पोलिसांनी एमआयडीसी भोसरी, हिंजवडी, भोसरी, वाकड, दिघी परिसरातील चार स्पा सेंटर आणि एक लॉजवरकारवाई करून ते एक वर्षासाठी सीलबंद केले आहेत. या पुढे ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.