पिंपरी : येरवडा येथे एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला होता. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मित्राने खराळवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना आज (शुक्रवारी) दुपारी घडली.
जयेश रामदास मंगळवेढेकर (25, राहणार खराळवाडी, पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयेश याच्या खराळवाडी येथील मैत्रिणीचा मृतदेह येरवडा येथे संशयास्पद रित्या सापडला होता.
या घटनेनंतर जयेश हा खूप अस्वस्थ होता. त्याने आत्महत्येचा या आधीही प्रयत्न केला होता. त्यांनतर त्याने गळफास घेत त्यानेआत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.