मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्याला जाणार; सोबत आमदार-खासदार असणार

0

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. आगामी 6 एप्रिलला ते अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदार हेही अयोध्येत जातील.

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषणसिंह यांनी विरोध केल्यानंतर तो दौरा चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदार खासदारांसह अयोध्येला जाणार आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत सहा एप्रिलला गेल्यानंतर प्रभू रामाचे दर्शन घेतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाचा अयोध्येला जात आहेत. एकीकडे राज्यात हिंदूत्व आणि हिंदूत्ववादी भूमिकेवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र टाकणारे सीएम शिंदे यांचा हा दौरा मुख्यमंत्री म्हणून महत्वाचा आहे.

काही दिवसांपूर्वीच सीएम एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिले होते. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे याचा हा दौरा महत्त्वाचा आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रात काय राजकारण होते हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टता दिली गेली व त्यांनी म्हटले की, ”अयोध्या हे आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ.” यापूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के, भाऊ चौधरी, सुशांत शेलार अयोध्येत जावून आले होते. या तीनही नेत्यांकडून संध्याकाळी शरयू नदीवर आरती करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.