ईव्हीएम मशीन बिघडली कि भाजपला मत जाते : कपिल सिब्बल

0

नवी दिल्ली : इव्हीएम मशीन बिघडली की भाजपला मते जातात असे वक्तव्य ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. त्यामुळे इव्हीएमवर पुन्हा एकदा विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार असून आमच्या प्रश्नावर काय निर्णय घेणार आणि यासंबंधी काय उपाय करणार हे विचारणार आहोत. त्यांच्या उत्तरानंतर आम्ही निर्णय घेऊ असेही कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएमबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी गुरुवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सायंकाळी सहा वाजता ही बैठक झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उभय नेते बोलत होते.

राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेते या बैठकीसाठी आमंत्रित होते. यासाठी त्यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिले होते. या बैठकीत बॅलेट पेपरद्वारे लोकसभा निवडणूक घेण्याबाबत चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे.

कपिल सिब्बल म्हणाले, इव्हिएमबाबत आम्ही अनेकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलो आहे. मशीनमध्ये जेव्हा – जेव्हा खराबी येते त्यानंतर मतदान भाजपला जाते. याबाबत आम्ही काही प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न केले होे. अजूनही निवडणूक आयागाने उत्तर दिले नाही. आम्ही केलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर द्या. त्यामुळे लोकांमधील संम्रभ दूर होईल. जर त्यांनी उत्तर दिले तर ठिक पण उत्तर दिले नाही तर आम्ही सर्व राजकीय पक्ष म्हणून काय निर्णय घ्यायचा ते घेऊ.

कपिल सिब्बल म्हणाले, बाकी देशात जर इव्हीएमचा वापर होत नसेल तर आपल्या देशात याचा वापर का होतो? हा आमचा सवाल आहे. वन मॅन वन वोट हे आपल्या देशाचे मुलभूत तत्व आहे. पराभव आणि विजय होतात. परंतु चुकीच्या पद्धतीने कुणी जिंकणे हे आम्हाला मंजूर नाही.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराबाबत शंका असलेल्या सर्व राजकीय पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी पत्र लिहिले आहे. 2024 मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या दृष्टीने ही बैठक बोलावण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले. आयटी व्यावसायिक आणि क्रिप्टोग्राफरचे तज्ञ देखील बैठकीत सहभागी होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी पत्रात लिहिले आहे की, तज्ज्ञांच्या मते कोणतीही चिप असलेली मशीन सहजपणे हॅक केली जाऊ शकते. पवार म्हणाले की, आम्ही अनैतिक घटकांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आपण आयटी तज्ञ आणि क्रिप्टोग्राफरचे मत देखील ऐकले पाहिजे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. ईव्हीएमबाबत समविचारी पक्षांशी एकमत होईल, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतरही आयोगाने या विषयावर उत्तर न दिल्यास न्यायालयात जाणार असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनात झालेल्या राजकीय विषयावरील ठरावात काँग्रेसने हा विषय मांडला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.