मुंबई पोलीस उपायुक्ताच्या नावाने घातला लाखोंचा गंडा

0

पिंपरी : सायबर गुन्हेगार नागरिकांना लुबाडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करत असतात. मात्र, आता थेट पोलीस उपायुक्तांचेनाव घेऊन एका महिलेला तब्बल पावणे पाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रावेत येथे 27 मार्च2023 रोजी सव्वापाच ते साडेसात या कालावधीत घडला. आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करुन फसवणूक केल्याचा प्रकारउघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रमा विजय खंडकर (31 रा.रावेत, ता. हवेली) यांनी सोमवारी (दि.3) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी9368317294 या क्रमांकाच्या मोबाईल धारकावर आयपीसी 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन तो आयपीएस अधिकारी अजयकुमार बन्सल बोलत असल्याचेसांगितले. फिर्यादी यांच्या आधार कार्डच्या नंबरचा आधार कार्डच्या फोटोचा आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी गैरवापर होऊ शकतो. तुमच्या बँक खात्यावरुन सहा व्यवहार झाले असून त्यांचा गैरवापर झाला असल्याचे आरोपीने सांगितले.

आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करुन संशयित सहा व्यवहारांची तपासणी करण्यासाठी प्रत्येकी 98 हजार 326 रुपये सिक्युरिटीम्हणून मागितले. त्यानंतर 5 लाख 89 हजार 956 रुपये दोन बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचेलक्षात आल्यानंतर महिलेने रावेत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अजयकुमार बन्सल हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. बन्सल यांनी नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली येथे काही वर्षे कामकेले. त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले. गेल्यावर्षी त्यांची बदली सातारा येथून मुंबई पोलीस दलातपोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.