आदित्य ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान

0

मुंबई : मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. तर शिंदेंनी ठाण्याला बदनाम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर येत लढावे, मी एकटा तुमच्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे, हे राज्य छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, तर माझ्या नादाला लागलात तर तुमचे नाव विसरायला भाग पाडेल असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारांच्या बद्दल लोकांच्या मनात संताप आहे, तो दिसून येतोय. मला प्रत्येक ठिकाणी लोक सांगताय तुमच्यासोबत आहे. आम्हाला मोर्चा काढण्यासाठी अटी घालण्यात आला, आम्ही आयुक्तांच्या ऑफीससाठी मोठे कुलुप आणले आहे. असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारांमुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब होत आहे. मोक्का लागलेली माणसं पुण्यात फिरताना दिसून येत होते. पोलिस काही करु शकत नाही कारण तिथे मुख्यमंत्री फोन करतात काही बोलू नका. महाराष्ट्रात एवढं गलिच्छ राजकारण कधी पाहिले नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंसारखे फेसबूक लाईव्ह करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला. मात्र, त्यांनी देशाचे पंतप्रधानच बदलून टाकले, दिल्लीत जात त्यांनी ठाकरे अडनाव मिळते का याची चाचपणी देखील केली असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. पुण्यात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये पाठवला, अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले, अजून किती प्रकल्प त्यांना देणार असा संतप्त सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गुजरातला दोन मुख्यमंत्री मिळाले आहे, आम्हाला एकतरी मुख्यमंत्री द्यावर अशी खोचक टीकाही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. आम्ही लवकरच येणार असून गद्दारांना त्यांची जागा दाखवणार आहोत. या सरकारच्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे. महिला राज्यात सुरक्षित दिसून येत नाहीये, एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी राज्य अंधारात गेले.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या शहरात जर अशी घटना घडली असली तरी त्यांना काही वाटत नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ठाण्याला तुम्ही देशभरात बदनाम केले, माफीचा व्हिडिओ बनवून घेतला तरी तिच्या पोटात लाता मारल्या गेल्या. ठाण्यात येऊन मी जिंकून दाखवणार असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. रोशनी शिंदे यांना महिला आणि पुरुषांकडून मारहाण करण्यात आली. महिलेवर हल्ला झाला आणि तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात येतो, आणि त्यांचे माजी महापौर समर्थन करतात हे अयोग्य आहे. सुसंक्कृत ठाणे यामुळे एकदम बदनाम झाले. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार काही तासांचे आहे, सुप्रीया सुळे आणि सुषमा अंधारेंबद्दल अगदी वाईटठ बोलेल जाते, महिला सुरचात नसताना मुख्यमंत्री शांत बसतात हे कौतुक करण्यासारखे आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. चोराचा पक्ष कधी असू शकतो का? ती टोळी आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदेच्या लोकांनी महिलेवर हात उचलले जातात, तिची तक्रार दाखल करुण घेतली जात नाही. महाराष्ट्राचे नाही तर गुजरातचे मुख्यमंत्री आहे, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे करणे गरजेचे आहे, ते करणारच. आमचे सरकार येताच सर्व जणांची चौकशी लावणार असा इशारा आदित्य ठाकरेंनी पोलिसांना दाखवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.