१०० व्या “मन की बात”चे चिंचवड मतदारसंघात १०० हून अधिक ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण; शंकर जगताप यांनी शिक्षकांसोबत ऐकले पंतप्रधानांचे विचार

0
पिंपरी :- देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात”च्या १०० व्या भागाचे रविवारी (दि. ३०) प्रसारण झाले. भाजपने चिंचवड विधानसभा मतदारसंघात १०० हून अधिक शक्तीकेंद्रावर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण केले. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपळेसौदार येथील जी. के. स्कूलमध्ये शिक्षकांसोबत “मन की बात” कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मांडलेले विचार ऐकले. देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांसोबत पंतप्रधानांचे विचार श्रवण करणे आनंददायी होते. हा कार्यक्रम ऐकल्यानंतर जमीनीशी जोडलेली एक व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान आहे याची प्रचिती येते. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याची भावना शंकर जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रसारण संपल्यानंतर व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवरून देशभरातील लोकांबरोबर “मन की बात” कार्यक्रमातून संवाद साधतात. या संवादातून ते स्वतःची विचारधारा, देशाची प्रगती, नवोपक्रम तसेच यशस्वी देशवासी,  स्वच्छता, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि विकास अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात. त्यामुळे हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमाचे आज (रविवार) १०० वे प्रसारण झाले आणि पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी मनमोकळा संवाद साधला. शतक पूर्ण केलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण देशात प्रचंड उत्सुकता होती.
या कार्यक्रमाचा १०० वा भाग पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक घटकातील नागरिकांपर्यंत पोहोचावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने जोरदार तयारी करण्यात आली होती. शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातही विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाजपने या मतदारसंघात १०० हून अधिक शक्ती केंद्रावर “मन की बात” कार्यक्रमाचे सकाळी अकरा वाजता थेट प्रसारण केले. शहरातील हजारो नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपळेसौदागर येथील जी. के. स्कूलमध्ये “मन की बात” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार ऐकले.
या कार्यक्रमाचे प्रसारण संपल्यानंतर बोलताना शंकर जगताप म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा पहिला भाग ३० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला. या कार्यक्रमाचा १०० भाग रविवारी प्रसारित झाला. देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांसोबत मन की बातच्या १०० व्या भागाचे श्रवण करणे, पंतप्रधान मोदी यांचे विचार ऐकणे माझ्यासाठी आनंददायी होते. या कार्यक्रमाला शहराच्या कानाकोपऱ्यातील लोक जोडले गेले. चिंचवड मतदारसंघातही लोकांनी आवडीने हा कार्यक्रम ऐकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय देशवासीयांना दिले हे त्यांचे मोठेपण असल्याचे ते म्हणाले.”
Leave A Reply

Your email address will not be published.