पोलीस आयुक्त ‘ट्विटर’वरुन नागरिकांशी सवांद साधणार

प्रश्न, समस्या असतील तर थेट मांडण्याचे केले आवाहन

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना पोलीस खात्याशी संबंधित काही प्रश्न, समस्या असतील तर त्याथेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. कारण उद्या 5 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत स्वतः पोलीसआयुक्तट्विटरवरुन नागरिकांशी सवांद साधणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांच्या काही समस्या, अडचणी असतील तर त्या थेटमांडण्याचे आवाहन हि करण्यात आले आहे.

शुक्रवारी सायंकाळी स्वतः पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे cp_pccity या ट्विटर वर येणार आहेत. यावरून पोलीसआयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांनी आपल्या समस्या थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडाव्यात असे आवाहनकरण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.