पिंपरी : सांगवी पोलिसांनी व गोहत्या प्रतिबंधक पथक यांनी एका सराईत आरोपीला 2 पीस्टल व 4 जिवंत काडतुसासह अटक केलीआहे.ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.2) रात्री रक्षक चौकाजवळ केली.
राम परशुराम पाटील (29, वर्षे रा. शिवशोभा बिल्डींग जयमल्हार कॉलनी नं 6 थेरगाव पुणे मुळ गाव टाकळी, ता. उदगीर जिल्हा लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पेट्रोलिंग करत असताना एकजण सॅक घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला हटकले. हटकले असता तो झुडपतून पळून जाऊलागला.पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 2 स्टेनलेस स्टिलचे देशी बनावटीचे पिस्टलत्यास स्ट्रिगर गार्ड, मैगजिन असलेले व 4 जिवंत पितळी काडतुस (राऊंड) असा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी रिमांड घेत चौकशी केली असता आरोपीने रावेत पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. सांगवी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा सराईत असून त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.त्याच्यावरदेहूरोड,सांगवी,वाकड,हिंजवडी,रावेत,खडकी येथे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई सांगवी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील प्रमुख पोलीसउप निरीक्षक . एम.डी. वरुडे, पोलीस हवालदार शिंदे, संजय डामसे, पोलीस नाइक प्रविण पाटील, विजय मोरे, गोडे, सुहास डंगारे पाटील खंडागळे, माने, , शिंगोटे, लेकुरवाळे तसेच गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहा पोलीस निरीक्षक गणेश खारगे, विशालगायकवाड, आकाश पांढरे या पथकाने केली आहे.