पिंपरी : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्याराने वार करण्यात आले आहेत. तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी हा प्राणघातक हल्ला झाला. ते जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटायेथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वारकेले.
आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटायेथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यामुळे तळेगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेअसून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.