डोक्यात गोळ्या घातल्याने किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवदेन देऊन येताना घडला प्रकार
पिंपरी : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची आज शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हत्याकरण्यात आली. तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन परत येत असताना आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्यारानेवार करण्यात आले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
किशोर आवारे यांच्यासोबत असणारे प्रत्यक्षदर्शनीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचेमुख्याधिकारी यांना पंतप्रधान आवास योजनेबाबत निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत गेले होते.
मुख्याधिकारी यांची भेट घेऊन ते खाली आले होते. त्यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी आणि नागरिक उभा होते. त्याच दरम्यान एकामहिलेने आवारे यांना आवाज दिला. आवारे हे त्या महिलेच्या दिशेने जात असताना पाठीमागून एका हल्लेखोराने त्यांच्या डोक्यातपिस्तुलातून गोळी झाडली.
हल्लेखोरांच्या इतर साथीदारांनी एक पोटात, एक छातीत आणि पुन्हा एक डोक्यात गोळी झाडली. तसेच दबा धरून बसलेल्यानीकोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते.
आवारे यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयातउपचारासाठी दाखल केले. मात्र उवचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आवारे यांचा मृतदेह शवविच्छेदयासाठी पिंपरी येथीलयशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आलेला आहे. याबाबत माहिती मिळताच आवारे यांच्या समर्थकांनी रुग्णालय परिसरातमोठी गर्दी केली आहे.