आवारे खून प्रकरणात चार आरोपी अटकेत

0

पिंपरी : किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हादाखलकरण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार आरोपी अटक केले आहेत.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोरनिर्घृणपणेहत्या करण्यात आली.

श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार, आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीपगराडेयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यामाजीनगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने संदीप विठ्ठल मोरे (रा. आकुर्डी) याला अटक केली आहे. तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत होते. जनसेवाविकास सेवा आघाडीच्या माध्यमातून ते तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रीय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधकअसलेलेआमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांच्यात वाद होत असत.

मागील सहा महिन्यांपासून किशोर आवारे यांनी आमदार शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यापासूनआपल्याजीवाला धोका असल्याचे त्यांच्या आईला सांगितले होते. 15 सप्टेंबर 2022 रोजी फिर्यादी यांच्या वाहन चालकाला तोफिर्यादीयांच्यासोबत असल्याने सुधाकर शेळके आणि त्यांच्या साथीदाराने जातीवाचक शिवीगाळ केली होती.

किशोर आवारे हे त्यांचा मित्र संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नसे. संतोष शेळके यांना किशोर आवारे सतत मदत करत असत म्हणून सुनील शेळके आवारे यांच्यावर चिडून असे, असे फिर्यादीतम्हटलेआहे.

किशोर आवारे यांनी मागील दोन वर्षांपासून स्वत:चा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय विरोध केला. चुकीच्याकामाबाबत वेळोवेळी निदर्शने केली. या रागातून तसेच त्यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार शेळके यांच्या वर्चस्वालाधोकानिर्माण झाला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात गेले असता तिथे श्याम निगडकर आणित्याच्यातीन अनोळखी साथीदारांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारलेअसल्याचेहीफिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.