पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर वडिलांच्या कानशिलात लगावल्याच्या रागातून किशोर आवारे यांच्याहत्येची सुपारी दिली असल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सुपारी दिलेल्या गौरव चंद्रभान खळदे (रा. तळेगाव) याला अटक केली आहे. माजी नगरसेवक चंद्रभान खळदे आणि किशोरआवारे यांचा जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी चंद्रभान खळदे यांच्या कानशिलातलगावली होती. त्याचा राग मुलगा गौरव याच्या मनात होता. त्यातूनच त्याने इतर आरोपींना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली, असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी पोलिसांनी श्याम अरुण निगडकर (46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (32), आदेश विठ्ठल धोत्रे(28, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (32, रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) यांना अटक केली आहे.
आरोपींना शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीआहे. पोलीस कोठडीत असताना आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
वडिलांच्या कानशिलात लगावल्याने गौरव याने सुपारी दिली. हत्या केल्यानंतर आरोपी कर्जत येथे एका फार्म हाउसवर जाणार होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी फार्म हाउस पाहून ठेवले होते. किशोर आवारे यांची हत्या केल्यानंतर नगरपरिषद कार्यालायासामोरूनकार मधून आरोपी पळून जाणार होते.
मात्र गोळीबाराचा आवाज झाला आणि त्यावेळी नगरपरिषद कार्यालयासमोर लोकांची मोठी गर्दी जमा होऊ लागली. त्यामुळे आरोपींनीकार मधून पळून न जाता काही अंतर पायी पळून गेले आणि तिथून दुचाकी हिसकावून पळाले असल्याचेही चौकशीत समोर आलेअसल्याची सूत्रांची माहिती आहे. सुपारी प्रकरणासह अन्य सर्व शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत.