व्यवसायिकाकडे 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
खंडणीखोराकडून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
पुणे : पुण्यातील खराडीमधील इ ऑन आयटी पार्क येथे सॉफ्टवेअरचा व्यावसाय करणार्याकडे 5 कोटीची रूपयांची खंडणीमागणार्यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न खंडणीबहाद्दरांनी केला. प्रसंगावधानराखत गुन्हे शाखेतील पोलिसांनी खंडणीबहाद्दरांवर गोळीबार केला असता गोळी खंडणीबहाद्दरांच्या गाडीच्या पाठीमागील चाकांवरलागली आहे. दरम्यान, खंडणीबहाद्दर हे तथाकथत पत्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी चारवाजण्याच्या सुमारास पाटस टोल नाक्याच्या जवळ घडली आहे. महेश सौदागर हनमे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथीदार दिनेश हनमेयांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे ऑगस्ट 2022 पासून खराडी येथील इ ऑन आयटी पार्कमधील सॉफ्टवेअर व्यावसायिकयांच्याकडे खंडणी मागत होते. त्यांनी तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना 3 लाख 80 हजार रूपये दिलेले आहेत. दरम्यान, हनमे याच्याकडून वेळाेवेळी पैशाची मागणी होत होती. महेश सौदागर हनमे हा स्वतः पत्रकारअसल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळ्या खोट्या बातम्या तयार करून त्या बातम्याव्हॉट्सअॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, आज महेश हनमेने व्यावसायिकास कुठल्याही परिस्थिती 50 लाख रूपये हवे आहेत अशी धमकी दिली होती. त्यासाठी त्यानेत्यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील हॉटेल स्वराज येथे बाेलावले होते. व्यावसायिकाने याबाबतची माहिती गुन्हे शाखेतीलवरिष्ठ पोलिस अधिकार्यांना दिली होती.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांतचव्हाण आणि इतर पोलिस अंमलदार हे आरोपींच्या मागावर आज (गुरूवार) मोहोळकडे रवाना झाले.
पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली. पाटस टोल नाक्याजवळ पोलिस गेले असता
तेथे आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत आरोपींवर गोळीबार केला. गोळ्या गाडीच्या पाठीमागील टायरवर लागल्या आहेत. पोलिसांनी पाठलाग करून महेश सौदागर हनमे आणि दिनेश हनमे यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.