पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. शहरातील रस्त्यावरुन आपल्याला फुडचीडिलिव्हरी रात्रीअपरात्री करण्यासाठी जाताना दिसतात. फुड डिलिव्हरी करत असल्याने त्यांच्याकडे कोणी संशयानेही पहात नाही. याचाच गैरफायदा घेऊन एका टोळक्याने अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत त्याचे पार्सल पोहचविण्यासाठीचक्क डनजो ऑनलाईन डिलिव्हरी अॅपचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान, अटक आरोपींकडून आतापर्यंत तब्बल 1 कोटी 14 लाख रूपयेकिंमतीचे 41 हजार 986 मिलीग्रॅम एलएसडी जप्त करण्यात आले आहे.
रोहन दीपक गवई (वय २४, रा. डि पी रोड, कर्वे पुतळा, कोथरुड), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय ३६, रा. बाणेर, मुळ कोडोली, सातारा), धिरज दिपक लालवाणी (वय २४, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय २५, रा. सनसिटी रोड), ओंकार रमेशपाटील (वय २५, रा.वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी रोहन गवई, धिरज लालवाणी आणि ओंकार रमेश पाटीलयांच्या ताब्यातून 51 लाख 60 हजार रूपये किंमतीचे एलएसडी जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, ओंकार रमेश पाटील याच्याकडेसखोल तपास केला असता त्याने त्याच्या अॅक्टीव्हा गाडीच्या डिक्कीत काही माल लपवुन ठेवला असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याच्या गाडीच्या डिक्कीतील 62 लाख 70 हजाराचे एलएसडी जप्त केले आहे.
पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना कोथरुड व परिसरात डनजो ऑनलाईन डिलिव्हरी अॅपद्वारे एल एस डी या अंमली पदाथार्ची खरेदीविक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रोहन गवई याला पकडून त्यांच्याकडून एल एस डी जप्त केले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे इतर साथीदारही असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्य चौघांना बाणेर, सिंहगड रोड, पिंपळेसौदागर, वाकड परिसरातून अटक केली.