नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दिव्य संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन; ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’चीही स्थापना

0

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या सोबतचलोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक राजदंडसेंगोलचीही स्थापना करण्यात आली. यावेळी पूजा बहुधार्मिकप्रार्थनेच्या उच्चारणात संसदेच्या इमारतीचे उद्घाटन झाले.

नवीन इमारतीच्या स्मरणार्थ फलकाचे अनावरणही मोदी यांनी  केले. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अधेनाम द्रष्टेउपस्थित होते. द्रष्टे यांनी  ‘सेंगोलप्रतीक पंतप्रधान मोदींना सुपूर्द केले.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हंटले, की  नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 142 कोटी भारतीयजनतेच्या इच्छा पूर्ण केल्या. हा एक ऐतिहासिक दिवस आहे.

एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, “आज देशवासियांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, या दिवशी माननीयपंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवन देशवासियांना समर्पित करणार आहेत. त्याबद्दल पंतप्रधान अभिनंदन आणि आभाराचे पात्र आहेत. त्यांनी उचललेले ऐतिहासिक पाऊलाबद्दल मी पंतप्रधानांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी 142 कोटी भारतीय जनतेच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत.”

सात दशकांपासून ऐतिहासिकसेंगोलचे घर असलेल्या अलाहाबाद संग्रहालयातील अधिकायांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतीलनवीन संसद भवनात त्यांचा अनमोल ठेवा हा त्यांच्यासाठी तसेच प्रयागराजच्या रहिवाशांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘सेंगोल’, सोन्याचा कोट असलेले चांदीचे बनवलेले चोलयुगीन राजदंड 1947 मध्ये ब्रिटिशांकडून झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे. आज ते लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित केल्याने त्याची किंमत कैक पटीने वाढली.

Leave A Reply

Your email address will not be published.