‘ये डर अच्छा है’ : संजय राऊत

0

मुंबई : शनिवारी नांदेडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. सभेत अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. याला ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण सर्वांनी निवांत ऐका, अतिशय मजेशीर आहे.
राऊत म्हणतात की, मला प्रश्न पडला आहे की, हे भाजपा चे महासंपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन.

अमित भाई यांच्या भाषणातील एकूण वीस मिनिटांतील तब्बल 7 मिनिटे उद्धव ठाकरे यांच्यावर होती. म्हणजे अजून ही ‘मातोश्री’ चा धसका कायम आहे. शिवसेना फोडली, नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. म्हणूनच ‘ये डर अच्छा है’ . जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे. पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले.

आजही या राज्यातील जनता उद्धव ठाकरे, मातोश्रीवर निष्ठा ठेवून आहेत. ठाकरेंच्या शब्दावर आजही राज्यातील जनतेवर विश्वास आहे. अमित शहांवर विश्वास ठेवत नाही. असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले.

अमित शहांनी विचारलेल्या प्रश्नात त्यांनीच चिंतन करण्याची गरज असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. अकाली दल, शिवसेना त्यांच्यासोबत राहिले नाही. त्यांना 2024 ला कळेल की कोणामुळे ते सत्तेत होते.

कोल्हे आणि लांडगे कातडे घेऊन फिरत असतात. खरा वाघ येतो, तेव्हा बोगस लोक पळून जातात. बोधचिन्हच वाघ आहे. या देशातील खरा वाघ शिवसेना आणि ठाकरे परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.