पिंपरी : साऊथ आफ्रिकेत The Ultimate Human Race म्हंणुन जगप्रसिद्ध, खडतर असणारी ९० किलोमिटरची मॅरेथॅान (कॉम्रेड) पिंपरी–चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या दोन मित्रांसह इतरांनी यशस्वी पार केली.
हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे राम गोमारे यांनी हि खडतर मॅरेथॉन 11 तास 17 मिनिट आणि 56 सेकंदात पार केली. यासाठी गोमारे यांनी अथक परिश्रम केले आहेत. पोलीस खात्यात असून देखील बंदोबस्त, तपास या सगळ्यातून वेळ काढत स्वतःच्या‘फिटनेस‘ कडे लक्ष दिले. यामुळेच साऊथ आफ्रिकेतील हि खडतर स्पर्धा ते पार करु शकले.
हिंजवडी – वाकड परिसरातील उद्योजक पांडुरंग बोडके यांनी हि खडतर स्पर्धा अवघ्या 9 तास 52 मिनिट आणि 15 सेकंदामध्ये पारकेली. बोडके यांनी चांगला ‘परफॉम्स‘ करत कमी वेळात हि स्पर्धा पार केली. स्वतःचे बिझनेस संभाळून सतत मेहनत केली.
सचिन वाकडकर यांनी 11 तास 41 मिनिट आणि 40 सेकंदामध्ये हि स्पर्धा पार केली. वाकडकर यांनी हि स्वतःचे बिझनेस संभाळत‘फिटनेस‘कडे लक्ष देत या स्पर्धेसाठी मोठे कष्ट घेतले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, उधोजक पाडुरंग बोडके, सचिन वाकडकर यांनी यापूर्वी कझाकिस्थान येथे पार पडलेल्या स्पर्धेतयश मिळवत ‘आयर्नमॅन‘ किताब मिळवला आहे. तर आता साऊथ आफ्रिकेतील स्पर्धा पार करत ‘कॉम्रेड‘ किताब मिळवला आहे.