बिपरजॉय चक्रीवादळ : कोकण -गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकत आहे. हे वादळ 15 जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. आज कोकण- गोवा भागात तर 15 जूनला गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 7500 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

या दरम्यान 150 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. त्याआधी, चांगली गोष्ट म्हणजे वादळाची तीव्रता कमी झाली आली आहे. असे असले तरी ते अजूनही धोकादायक आहे.

वादळामुळे गुजरातच्या किनारी भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील दोन मुले भुज येथील असून, त्यांच्या अंगावर भिंत पडली, तर एका महिलेवर झाड पडले.

गुजरातच्या कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारी जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत 7500 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आजपासून 23 हजार लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.