आवारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कधी पकडणार?

सुलोचना आवारे यांचे लाक्षणिक उपोषण; पोलीस आयुक्तांना निवेदन

0

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा एक महिन्यापूर्वी खुन झाला.  मात्र अद्याप मुख्य आरोपीलाअटक झालेली नाही. किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तपास गतीने करण्याच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या मागावर दोन पोलीस पथके रवाना केलीआहेत.

किशोर आवारे हत्या प्रकरणात गौरव भानू खळदे (रा. तळेगाव), शाम अरुण निगडकर (46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (32), आदेश विठ्ठल धोत्रे (28, रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (32, रा. आकुर्डी), श्रीनिवासउर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

बांधकाम साईटवर बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याच्या संशयावरून किशोर आवारे आणि भानु खळदे यांचा मागील वर्षी तळेगाव दाभाडेनगर परिषदेच्या कार्यालयात वाद झाला. यामध्ये किशोर आवारे यांनी भानू खळदे याच्या कानशिलात लगावली. त्या रागातून भानूखळदे याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने आरोपींना सुपारी दिली. त्यातून 12 मे रोजी दुपारी चार जणांनी किशोर आवारे यांच्यावर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हल्ला करून त्यांची हत्या केली.

दरम्यान पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये हत्या करणारे चार जण, त्यांना मदत करणारा एक आणि आरोपींना सुपारीदेणाऱ्या एकाचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर भानू खळदे पळून गेला. या हत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मुख्य आरोपीच्या अटकेसाठी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी मंगळवारी (दि. 13) लाक्षणिकउपोषण केले. त्यांनी मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत झालेल्यातपासाची संपूर्ण माहिती आवारे यांना दिली.

दरम्यान, किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे मावळ परिसरामध्ये राजकीय वाद पेटला आहे. एक गट खुनाच्या घटनेमध्ये राजकीयवादातून काही लोकांची नावे गोवल्याचा आरोप करत आहे तर दुसरा गट वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून घडवूनआणल्याचा दावा करत आहे.

किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. सुरुवातीला या पथकाच्या प्रमुख म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, कट्टे यांचीबदली झाली. त्यानंतर कार्यभार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट पाच, गुंडा विरोधी पथक ही दोन्ही पथके तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच एसआयटीला अन्य एक पथकमदतीला देण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.